Tree plantation : महसूल सप्ताहानिमित्त सिध्दनाथ येथे वृक्षारोपण
नांदेड| महसूल सप्ताह निमित्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी विविध लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज वाजेगाव महसूल मंडळातील सिध्द्नाथ येथील शिवानंद स्वामी संस्थानच्या परिसरात उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्यांनी परिसरातील वृध्दाश्रमास भेट देऊन जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला .
महसूल सप्ताह निमित्त 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताह आरंभ झाला असून तहसील कार्यालय नांदेडच्यावतीने गावपातळीवर विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले. या सप्ताहात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. महसूल सप्ताहा निमित्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर घेण्यात आले आहे. नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, परीवीक्षाधीन तहसीलदार अभयराज नानजुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुन...
