Treatment by expert doctors : बौद्धीक अक्षम मुलांच्या आरोग्य शिबीरात देशातील तज्ञ डॉक्टरांचा उपचार
नांदेड| नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला असून सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक झाले आहे.अशावेळी सातत्यपूर्ण 15 वर्ष मेंदूचे विकार असलेल्या बौद्धीक अक्षम मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, कमल उडवाडिया फाउंडेशन मुंबई, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार 20 मार्च रोजी प्रारंभ झाला. पुढील दोन दिवस हे शिबीर चालणार आहे.
आज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यक...
