Thursday, May 14

Tag: took charge

Rahul Kardile ; नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

Rahul Kardile ; नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पदभार स्वीकारला

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड। नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आज गुरुवारी सकाळी रुजू झालेत.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यापूर्वी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. सन 2015 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी , परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चं...
हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

हिमायतनगर येथे प्रभारी गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले यांनी पदभार स्वीकारला -NNL

नांदेड
हिमायतनगर। हिमायतनगर येथील गटसाधन केंदात कर्तव्यावर असलेले गटशिक्षण अधिकारी शिवानंद शिवाचार्य हे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर येथील गटसाधन केंदातील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त होते. अखेर शिक्षण विभागाला मुहूर्त सापडला. इस्लापूर येथील शिक्षण विस्तार अधिकारी केशव मेकाले यांना हिमायतनगर गटसाधन केंद्राचा बिईओ चा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी आपल्या पदाचा नुकताच पदभार स्वीकारला असून हिमायतनगर तालुक्यात जवळपास शंभर च्या वर शिक्षकाची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाची विस्कटलेली घडी निट करणे हे नूतन गटशिक्षण अधिकारी यांच्यासमोर अवाहन असणार आहे. तसेच तालुक्यातील दांडी बहाद्दर शिक्षकांना सरळ करून शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. गटसाधन केंदात नूतन गटशिक्षण अधिकारी केशव मेकाले हे रुजु झाल्यानंतर त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी ...
error: Content is protected !!