इस्लापूर येथे नवचेतना संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे। मराठवाड्यात महाग्रामीण नवचेतना संवाद यात्रेस प्रारंभ झाला असुन या यात्रेच्या निमित्ताने इस्लापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये सामाजिक सुरक्षा, शेतकरी के.सी.सी नुतनीकरण, बचतगट महीला मेळावा, डिजिटल व वित्तीय साक्षरता मेळावा, वृक्षारोपण यावर महत्व पटवून सांगितले.
इस्लापुर येथे गुरूवारी सायंकाळी महाराष्ट्र ग्रामीण बॅक समोर पिक कर्ज नुतनीकरण केलेल्या शेतकरी विनायकराव देशमुख, दिंगाबर जाधव, नंदकुमार गादेवार, सुनिल आडे, गणेश जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र ग्रामीण बॅक चे छत्रपती संभाजीनगर येथील सहाय्यक सर व्यवस्थापक संगमकर, सर व्यवस्थापक षण्मुख वानखेडे, विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती याच्या हस्ते गौरविण्यात आले. तर नारी सक्ती, साईबाबा महीला, वैष्णवी महीला, भिमा माता, प्रगती महीला, लक्ष्मी स्वयसहायत्ता, दुर्गा माता...
