free mineral water : महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी लाखो अनुयायांसाठी बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनतर्फे मोफत मिनरल पाणी वाटप
नांदेड| बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ आज नांदेड शहरात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात लाखो बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते. उन्हाच्या तडाख्यातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम राहावा म्हणून बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने मोफत मिनरल पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
शहरातील आयटीआयजवळ महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळ्याजवळ तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर आणि मोर्चाच्या मार्गावरील विविध ठिकाणी एक लाखांहून अधिक मिनरल पाणी बाटल्या वाटप करण्यात आल्या. याशिवाय उन्हाच्या झळांपासून आंदोलनकर्त्यांना संरक्षण मिळावे म्हणून भव्य मंडपांची व्यवस्था देखील करण्यात आली होती.
या स्तुत्य उपक्रमात बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. शुद्धोधन गायकवाड, सुवर्णा वाघमारे, वैशाली लोहाळे, सूर्यकांता धोत्रे, मीन...
