Hadgaon, Himayatnagar Assembly : हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर -NNL
हिमायतनगर| हदगाव, हिमायतनगर विधान सभा मतदार संघात सत्ता परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. आजी माजी आमदाराच्या कार्यप्रणालीवर नाखूष जनता नव्या चेहऱ्याची वाट पाहत असून, वंचित आघाडीकडून अनेकजण अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करीत असले, तरी वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांची भुमिका निर्णायक ठरत असते. परवाच अँड. प्रकाश आंबेडकर हे नांदेड दौर्यावर असताना त्यांनी डाॅ. श्यामराव वाकोडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन अनेक विषयांवर चर्चा केली. त्यामुळे हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडी नवा पर्याय देण्याच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.
आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अँड. आंबेडकर यांची डाॅ. वाकोडे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट आगामी विधान सभेची उमेदवारी त्यांना बहाल करण्यासाठीच होती अशी चर्चा रंगत असतानाच फक्त घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे, त्यांच्या ...
