अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL
नांदेड| जिल्ह्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या खात्याची ई-केवायसी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे, मार्च-एप्रिल 2023 मध्ये झालेल्या गारपिठ व अवकाळी पावसामुळे, जुन-जुलै 2023 मधील झालेल्या अतिवृष्टीमुळे व नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते.
आजपर्यंत 5 लाख 14 हजार 183 शेतक-यांना 415 कोट...
