Bhadanta Payyabodhi Thero : प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा – भदंत पंय्याबोधी थेरो -NNL
नांदेड| राजकारणासह सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. नांदेडच्या नवतरुणांनी धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त महावंदनेचा केलेला हा उपक्रम भारतामध्ये एक आदर्श कृती म्हणून गणले जाईल आणि ह्या कृतीमुळे इतरांनी अनुकरण करुन सर्वत्र धम्माविषयी लोकांच्या मनामध्ये गोडी निर्माण होईल. आंबेडकरी युवा चळवळीपासून दूर जाता कामा नये कारण प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते महाबुद्धवंदना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भदंत विनय बोधिप्रिय, भदंत पंय्यारत्न, भदंत रेवत बोधीसह भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थिती होती.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये 'महा ...
