Wednesday, May 13

Tag: ‘Tissue culture’ technology

Tissue culture : ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात उभारणी

Tissue culture : ‘टिश्यू कल्चर’ तंत्रज्ञानाची ५० एकर क्षेत्रात उभारणी

कृषी, नांदेड
नांदेड,अनिल मादसवार| नांदेडच्या केळी उत्पादकांच्या शेतीला 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. ('Tissue culture' technology to be set up in 50 acres of land) त्यामुळे केळीचे उत्पादन अधिक दर्जेदार, रोगमुक्त आणि निर्यातीयोग्य होणार आहे. केंद्र शासनाद्वारे भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, नवी दिल्ली संस्थेच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यात ५० एकर क्षेत्रात 'टिश्यू कल्चर' तंत्रज्ञानाची उभारणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय पथकाने जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातील मौजे खुजडा येथील पन्नास एकर शासकीय गायरान जमिनीवर प्रस्तावित जागेची पाहणी केली. नांदेडसह जालना व जळगाव जिल्ह्याचादेखील यासाठी विचार करण्यात येत आहे. 'केळी' उत्पादनाचा उत्तम दर्जा व भरघोस उत्पादनातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी 'टिश्यू कल्चर' स्थापनेसह बीज उत्पादन, संरक्षण व संवर्धन सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पासाठी कें...
error: Content is protected !!