Wednesday, May 13

Tag: Thousands of Sarpanch representatives from Punjab welcomed enthusiastically at Markand

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

पंजाबमधील हजार सरपंच प्रतिनिधींचे मार्कंड येथे उत्साहात स्वागत

नांदेड, देश विदेश
नवीन नांदेड l पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे एक हजार सरपंच प्रतिनिधींचे नांदेड जिल्ह्यातील मार्कंड येथे अत्यंत उत्साहात व आपुलकीने स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय मार्कंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्कंड आणि प्रगती वन ग्रामसंघ मार्कंड यांच्या संयुक्त वतीने हा स्वागत समारंभ पार पडला. दि. २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या चार दिवसांच्या अभ्यास दौर्‍याच्या अंतर्गत ३१ जानेवारी रोजी पंजाबमधील सरपंच प्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ग्रामपंचायती व पंचायत समितींना भेटी दिल्या. या दौर्‍यात महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण व आदर्श उपक्रमांचा सखोल अभ्यास करण्यात आला. दोन्ही राज्यांतील ग्रामविकास विषयक कामांची माहिती, अनुभवांची देवाणघेवाण व चर्चा यामुळे हा दौरा अ...
error: Content is protected !!