अंगारिका चतुर्थी निमित्ताने वाढोण्याच्या इच्छापूर्ती श्री वरद विनायक दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी -NNL
हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर (वाढोणा) शहराजवळील पांडवकालीन कनकेश्वर तलावाच्या काठावर इच्छापूर्ती श्री वरद विनायक आणि श्री कनकेश्वर महादेव मंदिर आहे. येथील मंदिरात भाविक दर्शनासाठी दररोज येत असतात चतुर्थीला विशेष गर्दी असते. यंदाच्या नूतन वर्षातील हि पहिली अंगारिका चतुर्थी असल्याने आज सकाळपासून महिला मंडळींनी गर्दी केली होती अशी माहिती पुरोहित परमेश्वर बडवे यांनी दिली. मृग नक्षत्र प्रारंभ होऊन १५ दिवस झाले मात्र म्हणावा तास पाऊस झाला नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील भाविक भक्तांनी पाऊस पाणी चांगले पडू दे.... आणि बळीराजाला सुगीचे दिवस येऊ दे.... असे म्हणत पावसासाठी साकडे घातले आहे.
मंदिराची निमित्ती होऊन अनेक वर्ष लोटली मात्र भाव मंदिरावर कळस बसविण्याचा मुहूर्त लागला नव्हता. या मंदिराच्या कळस रोहणाचा मुहूर्त बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, दत्त संस्थान पिंपळगावकर आणि स...
