Gangadhar Gaikwad ; जिल्ह्यात लाखाच्या वर बोगस नोंदणी, हजारोनी भांडी व लाभ लाटले : मग चार जाणवरच गुन्हा दाखल कसा – कॉ.गंगाधर गायकवाड
नांदेड l जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेत लाखाच्या वर बोगस नोंदणी आणि कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून बोगस कामगारांना दणकावून पेट्या,भांडी आणि आर्थिक लाभ वाटप करून दीड ते दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे.
अशी तक्रार सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) चे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांनी लेखी स्वरूपात राज्याचे कामगार सचिव,आयुक्त, मुख्यमंत्री, कामगार मंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्याणीशी केली आहे.
अगदी मंत्र्यापासून वरिष्ठ अधिकारी या घोटाळ्यात मलीन झालेले आहेत. त्यामुळे योजना लाटणारे जाम खूष असून दीड ते दोन हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी गोरगरिबांना हेरून गुन्हे दाखल केले जात आहेत.
बांधकाम क्षेत्रात बोगस असणारे कामगारांनी शैक्षणिक सुविधेसह इतर योजना लाटण्यासाठी नोंदणी केली असल्यामुळे लोकप्रतिनिधी व वरिष...
