Monday, May 25

Tag: the post-mortem

Deer Forest News : दोन दिवस उलटले तरी हरीण मृत्यूचा पंचनामा नाही

Deer Forest News : दोन दिवस उलटले तरी हरीण मृत्यूचा पंचनामा नाही

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड / किनवट (प्रतिनिधी) जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील प्रसिद्ध हरीण पठारावर दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या हरीणाचा दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेला तब्बल दोन दिवस उलटूनही वन विभागाचे अधिकारी–कर्मचारी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले नसल्याने वनप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मृत हरीणाचा पंचनामा व शवविच्छेदन न झाल्याने मृतदेहाची विटंबना होत असून, वन विभागाच्या उदासीनतेमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाखो रुपयांचा पगार घेणारे कर्तव्यदक्ष कर्मचारी घटनास्थळी न पोहोचणे ही शोकांतिका नव्हे तर प्रशासनाची अपयशाची कबुली असल्याची प्रतिक्रिया वन्यप्रेमींनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांत पांगरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात हरीण ठार झाले होते. त्याचबरोबर परिसरात दोन ते तीन हरीणांचे संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्...
error: Content is protected !!