‘That Night and This Day’ : ‘ती रात्र आणि हा दिवस’ नाटकाने दिला माणुसकीचा संदेश -NNL
नांदेड| ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत स्वप्नरंग सांस्कृतिक संस्थेच्या वतीने शनिवारी (ता.३०) मुक्ताई प्रतिष्ठान, देगलूरतर्फे कुसुम नाट्यगृहात सादर झालेल्या ‘ती रात्र आणि हा दिवस’ या नाटकाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. माणसातील विकृती दूर करून माणूसपण जागवण्याचा संदेश देणाऱ्या या नाटकाने समाजमनाला अंतर्मुख केले.
विना आणि डॉ. रणजित देसाई यांचे सुखी कुटुंब अचानकपणे दरोडेखोर बबन गव्हाणकरच्या आगमनाने हलते. पोलिसांना चुकवत तो डॉक्टरांच्या घरात प्रवेश करतो. गोळी लागल्यामुळे उपचारासाठी डॉक्टरांना धमकावणाऱ्या बबनची खरी ओळख उघड होताच नाटकाला कलाटणी मिळते. पायलच्या अपंगतेचे कारण बबन असल्याचे कळताच डॉ. देसाई संतप्त होतात आणि त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतात. मात्र, विना देसाई यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
त्या आपल्या पतीला डॉक्टरांचा धर्म वाचवण्याचा असल्याचे पटवून देतात. ...
