Dr. Dilip Chavan ; सत्यशोधक विचार पुढे नेण्याची गरज – डॉ. दिलीप चव्हाण – NNL
नांदेड | आधुनिक मराठी साहित्य, समाज व संस्कृतीच्या जडणघडणीवर सत्यशोधक चळवळीचा मोठा प्रभाव पडला आहे. मानवी स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, बुध्दिवाद, सामाजिकता व परिवर्तनशीलता यांचे नवे भान सत्यशोधक चळवळीने दिले. सत्यशोधकीय तत्त्वविचारांमधून आत्मभान आलेल्या सजग व संवेदनशील सत्यशोधकांनी रचनात्मक सामाजिक कार्याबरोबरच साहित्यनिर्मिती केली. आज देशाला म. फुले यांच्या सत्यशोधक विचारांची गरज आहे. या विचारांचा वारसा पुढे नेण्याचीही गरज आहे असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाङमय व संस्कृती संकुलाचे संचालक प्रो. डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले. ते वर्षभर चाललेल्या व्याख्यानमालेच्या समारोपीय व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पिछडा शोषित संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एस. जी. माचनवार, ओबीसी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. रमेश शिंदे, लसाकमचे नां...
