Saturday, June 27

Tag: The market of vote-buying

Vote Buying : मत विक्रीचा बाजार आणि विवेकाचा मृत्यू

Vote Buying : मत विक्रीचा बाजार आणि विवेकाचा मृत्यू

नांदेड, लेख
लोकशाही ही केवळ मतदानाच्या यंत्रावर बोट ठेवण्याची प्रक्रिया नाही; ती विवेक, मूल्ये आणि आत्मसन्मान यांची कसोटी असते. अशा काळात, ज्या काळात मत म्हणजे माल आणि मतदार म्हणजे ग्राहक अशी भयावह मानसिकता तयार झाली आहे, त्या काळात डॉ. शिवदास हमंद यांनी घेतलेली भूमिका ही केवळ व्यक्तिगत निर्णय नाही—तो एक नैतिक उठाव आहे. “मत विकू नये” यावर लेख लिहिणे खरे तर खूप सोपी गोष्ट आहे. वर्तमानपत्रांचे रकाने, व्यासपीठांवरील भाषणे आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स या विषयाने ओसंडून वाहतात. पण घरी पैसे आलेले असताना ते परत करणे, मोह टाळणे, आणि ‘नाही’ म्हणण्याचे धाडस करणे—ही गोष्ट असामान्य आहे. हे धाडस डॉ. हमंद यांनी केले, म्हणूनच त्यांचा अभिमान वाटतो. ब्रह्मज्ञान सांगणारे आणि स्वतः कोरडे पाषाण आपल्या समाजात एक विचित्र विसंगती वाढताना दिसते. इतरांना ब्रह्मज्ञान सांगणारे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत, पण स्वतः मा...
error: Content is protected !!