The main work of municipal council : सीटूचा महापालिका आयुक्तांना घेराव, पूरग्रस्तांचे पंचनामे व यादीचे मुख्य कार्य मनपाचे -NNL
नांदेड| आपल्या अधिनिस्त कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी महापालिका आणि तहसील प्रशासन पटाईत आहे. दोन्ही ठिकाणी सर्व कामे अर्थपूर्ण संबंधातूनच होतात अशी परिस्थिती आहे. घरामध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झालेल्या पीडितांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे शहरातील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे.
गेल्या वर्षी नऊ कोटी रुपये निधी सीटू कामगार संघटनेने ३५ वेगवेगळी आंदोलने करून खेचून आणला होता. गेल्या वर्षीचे हजारापेक्षा अधिक पूरग्रस्तांना अनुदान वाटप झाले नाही. या वर्षी देखील सीटूने विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले आणि करोडो रुपये अतिवृष्टी अनुदान मंजूर करून घेतले. पन्नास टक्के बोगस लोकांना पात्र दाखवून मनपाचे वसुली लिपिक आणि तहसीलचे तलाठी यांनी संगणमताने मोठ्या प्रमाणात घोटाळा करून अनियमितता केली परंतु दोन्ही कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले.
यावर्षी देखील चार हजार लाभार्थ्यांना पहि...
