Cut down trees : गुंडवळ तलावाच्या बांधावरील झाडे तोडा: झाडे मोठी झाल्याने तलाव फुटण्याची शक्यता
श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील रुई-गुंडवळ येथील साठवण तलावाच्या बांधावर मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहेत. तसेच त्यामुळे बांध फुटण्याच्या स्थितीत आहे. शिवाय त्या ठीकांनी वाढलेल्या झाडे झुडपा मुळे साप विंचू व इतर हिंसक वन्य प्राणी त्या ठिकाणी निवास करीत असल्याने शेतकऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांच्या जीवित्वास हानी होण्याची शक्यता आहे. तसेच बांध - फुटल्यास गुंडवळ, गाव व तांडा तसेच रुई गावाचे मोठे नुकसान होइल त्यामुळे बांधावर मोठी झालेली झाडे तात्काळ तोडावीत अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे अनुसूचित जाती आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन कऱ्हाळे यांनी केली आहे
माहूर तालुक्यातील मोठ्या साठवण तलावापैकी एक असलेला मौजे गुंडवळ येथील तलाव गाळाने भरला असून थोडेसे पाणी जरी पडले तर तलाव पूर्ण भरून जातो तसेच अनेक वर्षापासून येथे वाचमन नसल्याने बांधावर मोठाली झाडे ...
