Unseasonal rains washed away : अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला
नांदेड| गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली. यात राज्यातील अनेक भागातील शेती पिकांना मोठा तडाखा बसल्याचे पहावयास मिळाले. नांदेड तालुक्यातील रहाटी, सोमेश्वर आदी परिसरातील शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला भुईमुग पिकाचा घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.
कर्जबाजारी झालेल्या शेतकर्याचे आधीच कंबरडे मोडलेले असतांना अवकाळी पावसाने मात्र त्यावर कहर केला आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना तात्काळ शासनाकडून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावी. या मागणीसाठी रहाटी येथील शेतकरी उद्धव बोकारे, आनंदा बोकारे, काशिनाथ बोकारे, संतोष बोकारे यांच्यासह इतर शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून मराठवाड्यात वादळीवार्यासह बरसणार्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या वादळी वार्य...
