Com. Arjun Aade : कर्जमाफी बाबत सरकार शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहे- कॉ. अर्जुन आडे
किनवट, परमेश्वर पेशवे| शेतकऱ्यांची मतं काढून घेण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. आज मात्र राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता कर्जमाफी करता येणार नाही अशी विधाने केली जात आहेत. सरकारने केलेला शेतकऱ्यांचा हा पुन्हा एकदा नवा विश्वासघात आहे. सरकारने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळावे व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अर्जुन आडे यांनी केली आहे.
माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी इतके मोठे अंथरूण राज्य सरकारचे सध्या नाही, असे विधानही राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याएवढे मोठे अंथरूण राज्य सरकारचे नव्हते याची जाणीव निवडणुकीत शेतकऱ्यांना आश्वासन देऊन मते पदरात पाडून घेतेवेळी नव्हती का...
