Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा गावात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पंचक्रोशी हळहळून गेली आहे. अल्प आजाराने मुलाचा मृत्यू झाल्याचे दुःख सहन न झाल्याने, वडिलांनीही काही तासांत प्राण सोडल्याची घटना घडली असून, बाप–लेकावर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली आहे.
सिबदरा गावचे रहिवासी गणेश रामलू ताडेवाड (वय 56) यांचे दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी अल्प आजाराने निधन झाले. ग्रामीण भागात मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करणारे गणेश ताडेवाड हे प्रामाणिक, मनमिळावू व कष्टकरी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन भाऊ, तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
गणेश ताडेवाड यांच्या निधनाची बातमी कळताच नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने दुःख व्यक्त केले. ते सध्या हिमायतनगर येथे वास्तव्यास असल्याने दि. ...
