High School students : तब्बल ४६ वर्षानंतर जगदंब हायस्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र
नांदेड| सोशल मिडीया, व्हॉटसअॅप, फेसबुक या माध्यमांचा कसा सकारात्मक वापर होऊ शकतो हे जगदंब हायस्कूल माहूरच्या १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांनी दाखवून देत तब्बल ४६ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांचा स्नेहमिलन सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.
माहूरच्या जगदंब हायस्कूल येथे १९७८-७९ या वर्षात शिकत असलेले माजी विद्यार्थी, सोशल मिडीया, व्हॉटसअॅप, फेसबुकच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यापासून एकमेकांना शोधत होते. या माध्यमांचा कसा चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. याचे उदाहरण त्यांनी देत तब्बल ४६ वर्षानंतर हे सर्व विद्यार्थी एकत्र आले. प्रामुख्याने राजश्री फलटणकर यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, माजी विद्यार्थी प्रकाश जगत आणि संजय रामकृष्णराव कुलकर्णी यांनी निर्माण केलेली सकारात्मक उर्जा आणि सर्वांना एकत्र करण्याची नियोजन बध्दतता यामुळे तब्बल ४६ वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्...
