Politics Special : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर “स्वयंघोषित भावी” उमेदवारांची लगबग – जनतेची दिशाभूल की विकासाचा दिखावा?
हिमायतनगर, अनिल मादसवार | आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणूक आचारसंहिता व तारीख जाहीर होण्याच्या उंबरठ्यावर असताना शहरात विविध स्वयंघोषित “भावी उमेदवारांची” लगबग वाढली असून, जनतेची सेवा करण्याच्या नावाखाली केवळ प्रसिद्धीसाठी आणि सत्तेच्या हव्यासापोटी हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर "मीच शहराचा विकास करू शकतो" अशी हौसेने केलेली पोस्टांची रेलचेल सुरू असून, २५ ते 30 वर्षे वयाच्या तरुणांपासून ते मागील १५ वर्षांपासून "राजकारणात सक्रिय" असल्याचा दावा करणारे अनेक जण जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही पक्षाचे तिकीट मिळेल याची खात्री नसतानाही “मीच पुढचा लोकनायक” असा आव आणून दिशाभूल केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
शहराच्या विकासाच्या नावाखाली केवळ वैयक्तिक स्वा...
