District Collector Rahul Kardile : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली खडकूत येथे पीक कापणी प्रयोगाची पाहणी
नांदेड| यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगाला आधारभूत मानले जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक होऊ नये, शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी जिल्हास्तरावर प्रात्यक्षिक स्वरूपात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत आहेत.
आज जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नांदेड तालुक्यातील मौजे खडकूत येथे शेतकरी बालाजी नागुराव कंकाळ यांच्या शेतावर सोयाबीन पिकाची कापणी करून उत्पन्नाचा अंदाज काढण्यासाठी आयोजित प्रात्यक्षिकाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. कर्डीले यांनी शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व, पद्धती आणि त्यातून मिळणाऱ्या निष्कर्षांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी नुकसान भरपाईची रक्कम योग्य प्रकारे ठरविण्यासाठी पीक कापणी प्रयोग अत्यंत महत्त्वाचे असून त्यात पारदर्शकता व काटेको...
