Umarkhed ; माकप प्रणित लोकविकास संघर्ष समितीने उमरखेड नगरपरिषदेवर मोर्चा काढून आमरण उपोषण सुरु केले
उमरखेड l लोकशाहीर कॉ.डॉ.आण्णाभाऊ साठे नगर हे १०० टक्के मातंग वस्ती असलेले नगर असून ते मागिल २५ वर्षांपासून नागरी सुविधा पासून वंचीत आहे.
तेथील राहणाऱ्या मातंग समाजातील नागरिकांना घरटॅक्स पावती,घर नंबर,रस्ते,नाल्या,अभ्यासिका, अंगणवाडी,खेळाचे मैदान,समाज मंदिर आदी नागरी सुविधा देण्यात याव्यात यासाठी मागील दोन वर्षापासून मोर्चे आंदोलने काढून पाठपुरावा सुरु आहे.
दि.२८ एप्रिल रोजी साठे नगर येथे माकप नेते कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणित लोकविकास संघर्ष समिती फलाकाचे अनावरण केले.
दुपारी ३ वाजता फलकाचे अनावरण करून दुर्लक्षित असलेल्या वस्तीपासून नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला आणि मुख्याधिकारी श्री महेश पाटील यांच्यासोबत चर्चा करून उपरोक्त मागण्याचे निवेदन देण्यात आले. मुख्याधिकारी यांनी लेआऊट, सातबारा, गृहनिर्माण संस्थेचे प्रम...
