महापालिकेच्या जन्म-मृत्यु नोंद विभागाची आयुक्तांनी घेतली झाडाझडती -NNL
नांदेड। नजिकच्या कालावधीत महानगरपालिकेतील जन्म-मृत्यु नोंद विभागाच्या वाढत्या तक्रारी विचारात घेता दिनाक ०३.०७.२०२४ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी बैठक आयोजित करून या विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. या बैठकीस आरोग्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिरोन, डॉ.प्रतिभा कदम यांच्यासह इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्याऱ्यांची उपस्थिती होती.
महानगरपालिके मार्फत निर्गमित होणाऱ्या जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र प्राप्त होण्यासाठी नागरीकांना विलंब होत असल्याने नागरीकांना होणारी असुविधा टाळण्यासाठी तात्काळ आवश्यकत्या उपाययोजना करण्याच्या हेतुने आयुक्तांनी जातीने लक्ष घालुन या बैठकीचे आयोजन करुन अधिकान्याना सुचना केलेल्या आहेत.
वास्तविक पाहता जन्म-मृत्यु नोंद प्रमाणपत्र देतांना या विभागामध्ये केंद्र शासनाच्या व महानगरपालिकेच्या अशा दोन संगणक अज्ञावलीमध्ये नो...
