Accident ; भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजे वाहनाच्या जनरेटरची मोटरसायकलला जोराची धडक…! दुचाकीस्वराचा मृत्यू
किनवट, परमेश्वर पेशवे। जनरेटर सह भरधाव वेगाने धावणाऱ्या डीजेच्या वाहनाची दोरी तुटल्याने जनरेटर व मोटरसायकलचा भीषण अपघात झाल्याने या भिषण अपघातात मोटर सायकल चालकाचा मृत्यू झाला आहे, ही घटना ईस्लापुर ते हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील पांगरी तांडा येथे दिनांक 23 मे रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
या घटनेत मृत पावलेल्या तरूणांचे नाव योगेश काशीराम राठोड वय 35 वर्ष राहणार गोधन तांडा तालुका हिमायतनगर येथील रहिवासी आहे तर याच घटनेत दुसरा तरूण जखमी झालेल्या चे नाव गोरु अनिल राठोड वय 18 वर्षे राहणार बुरकुलवाडी तालुका किनवट येथील रहिवाशी आहे.
योगेश राठोड व गोरु राठोड हे दोघेही तरुण मोटरसायकल क्रमांक एम एच २६ झेड 9895 या मोटरसायकलने इस्लापूर कडे येत होते तर भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या डीजेच्या वाहनाला दोरीच्या साह्याने बांधून असलेले जनरेटर ची दोरी तुटल्याने हे जनरेटर मोटर...
