Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे रूपड बदललं… पण सुविधा विसरल्या? प्रवाशांच्या अडचणीत वाढ
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे नावीनीकरण विकास काम मोठ्या गाजावाजात झाले; मात्र प्रत्यक्षात स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी आजही जैसे थेच असल्याचे चित्र दिसत आहे. रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सुविधा, अस्वच्छता, गर्दीमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी आणि भाविक यांना दररोज असुविधांचा सामना करावा लागत असून, रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आता संतापाचे कारण ठरत आहे.
स्थानकावर ना पुरेशी पाण्याची सोय आहे, ना सुरक्षिततेची ठोस व्यवस्था. आरपीएफ किंवा जीआरपीएफची स्वतंत्र चौकी नसल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. किनवट आणि मुदखेड येथील पोलीस चौक्या तब्बल ६० ते ८० किलोमीटर अंतरावर असल्याने आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळणे कठीण ठरत आहे.
भाविकांसाठी दर्शनस्थळी जाण्यासाठी मोफत बससेवेची व्यवस्था नसल्याने अनेकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. लेडीज ...
