Tehsildar Pallavi Temkar : तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी स्वीकारला नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगरच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांना नगरपंचायत सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यांनी नगरपंचायत सिईओ पदाचा पदभार नुकताच स्वीकारला असून, नगरपंचायत कार्यालयातील कारभाराला आता शिस्त लागेल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हिमायतनगर सिईओ पद हे गेल्या अनेक वर्षापासून रिक्तच आहे. या पदाचा अतिरिक्त पदभार देऊन गेल्या ४ वर्षांपासून कारभार चालवण्यात येत आहे. येथील नायब तहसीलदार रामचंद्र ताडेवाड यांना सिईओ पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात नगरपंचायत अंतर्गत विकासाचा अनुशेष कायम राहीला. कोट्यवहडीच्या निधीतून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामाचा बोजवारा उडाला असून, याबाबत असंख्य तक्रारी पडून आहेत. एव्हढंच नाहीतर शहरातील स्वःच्छतेसह पाणी टंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नगरपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या अनेक सुविधा मिळत नसल्याने नागर...
