Kinwat ; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवटमध्ये महिलांची स्वीप प्रश्नमंजुषा – NNL
किनवट, परमेश्वर पेशवे l मतदार जनजागृती (स्वीप) कक्षाच्या वतीने महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी किनवट मध्ये महिलांची प्रश्नमंजुषा (स्वीप क्वीझ) आयोजित करण्यात येत आहे. याला शहरी भागासह ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून याप्रसंगी महिलांकडून "आम्ही मतदान करणारच " असे अभिवचन मिळत आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत , जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल प्रमुख मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 83- किनवट विधानसभा मतदार संघात सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांच्या संकल्पनेतील मतदार जनजागृती स्वीप कक्षाच्या वतीने महिलांची प्रश्नमंजुषा (SVEEP QUIZ) आयोजित करण्यात येत आहे.
गट शिक्षणाधिकारी तथा कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात सिद्धार्थनगर, गोकुंदा येथे म...
