A tree planted must be nurtured | वृक्ष लागवड करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन झाले पाहिजे – सुरेश आंबुलगेकर – NNL
नवीन नांदेड| मनपा नांदेड व कनिष्क नगरी वाघाळा यांच्या वतीने हरीत नांदेड अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन संबधीत पालकत्व स्विकारलेल्या महिलांनी केले पाहिजे असे मत सेवा निवृत्त कृषी संचालक सुरेश अंबुलेगकर यांनी केले.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका,गुरुद्वारा लंगर साहिब,नांदेड वृक्षमित्र फाऊंडेशन,नांदेड कनिष्क नगरी गृहनिर्माण संस्था, वाघाळा नांदेड आयोजित हरित नांदेड अभियान 2024 वृक्ष लागवड अध्यक्ष स्थानी सुरेश अंबुलेगकर व डॉ.मापारे सिडको क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.
मनपा नांदेड हद्दीत शहराती ल वाढत्या तापमानास नियंत्रित करण्यासाठी, नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा तसेच भावी पिढीच्या भविष्यासाठी कनिष्क नगरी वाघाळा नांदेड येथे लोक सहभागातून 61 ट्रि-गार्डसह वृक्षांची लागवड व संगोपन 21 जुलै 2024 रोजी सकाळी ...
