District Collector Rahul Kardile : विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार बायोमेट्रीक अद्ययावत करुन घ्यावे -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड| राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या जेईइ , नीट, एमएचसीईटी, एनडीए तसेच अन्य महत्त्वाच्या शैक्षणिक व प्रवेश परीक्षांमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना आधार आधारित ओटीपी अथवा प्रमाणीकरण आवश्यक असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांची आधार माहिती बायोमेट्रीकदृष्ट्या अद्ययावत नसल्यामुळे अशा परीक्षांमध्ये नोंदणी करताना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तात्काळ आधार अद्ययावत करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
दहावी, बारावी पर्यंतच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधारकार्ड अद्ययावत करणे ही काळाची गरज आहे. आधार बायोमेट्रीक अपडेट अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे. सर्व शाळा व महाविद्यालयांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांची आधार स्थिती तपासावी आणि ज्यांचे आधार बायोमेट्...
