Vigyan Bharati ; विज्ञान भारती आणि एस.जी.जी एस. यांच्या द्वारे आयोजित राज्यस्तरीय विज्ञान शिबिर संपन्न – NNL
नवीन नांदेड l नांदेड येथे श्री गुरू गोविंद सिंग अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात, विदयार्थी विज्ञान मंथन (VVM)२०२४-२५ परीक्षा संपन्न झाली.
8 डिसेंबर रोजी नांदेड येथील श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विज्ञान मंथन या परीक्षेची राज्य स्तरीय शिबिर/कॅम्प अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आला.
विद्यार्थी विज्ञान मंथन ही स्पर्धा परीक्षा एन.सी.ई.आर.टी. एन.सी.एस.एम.व विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यां करिता घेण्यात येते. विज्ञान विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर मार्गदर्शन मिळावे व संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी ही परीक्षा घेण्यात येते.याची प्रथम फेरी ही दिनांक २३ व२७ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन माध्यमातून पार पडली.त्यात संपूर्ण देशात १.५ लाख पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली....
