Welcome | तिरुमला परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथे कर्मचारी यांचा स्वागत व सत्कार -NNL
उमरी। श्री तिरुमला तिरुपती देवस्थान (टीटीडी) आंध्र प्रदेश येथे श्रीवरी परकामनी सेवा उमरीचे भुमिपुत्र,आरोग्य सेवेतील हिवताप विभागाचे राज्य पदाधिकारी, ग्रामीण रुग्णालय भोकरचे आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांच्या नेतृत्वात, नियोजनानुसार व पुढाकारातून २० अधिकारी व कर्मचारी यांनी दि. ८ जुलै ते ११ जुलै या कालावधीत तिरुमला, तिरुपती येथे श्रीवरी परकामनी सेवा ( हुंडी मधील रक्कम मोजदाद ) शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मधून निवड करण्यात आलेल्या कर्मचारी यांनी श्रीवरी परकामनी सेवा केल्या बदल उमरी येथील मित्र परिवार व बालाजी टिप्रेसवार परीवार यांच्याकडून सत्कार व स्वागत करण्यात आले.
जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत कर्मचारी आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, माधव कोल्हे, आरोग्य पर्यवेक्षक गंगाधर गन्लेवार, कैलास लंकलवाड, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांड...
