मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
श्रीक्षेत्र माहूर l कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे पहिल्या वर्षीचे मुकाबले जगभर गाजले असून यावर्षी दि 14 ते 16 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्यात तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या देखरेखि खाली कसून सराव करून तयार झालेला श्री रेणुका माता मंदिर क्रिकेट संघ सामन्यात भाग घेत असल्याने माहूरच्या नावलौकिकात भर पडणार असुन रेणुका देवी क्रिकेट संघ खेळताना चे प्रक्षेपण जगभर होणार असल्याने प्रशासक मंडळाच्या निर्णयाचे अभिनंदन होत आहे
कोल्हापूर येथे होणाऱ्या मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका माता मंदिराच्या क्रिकेट संघाची तयारी पूर्ण तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या देखरेखित क्रिकेट संघाचा कसून सराव
मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल दिवसरात्र क्रिकेट स्पर्धा १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ शास्त्री नगर मैदान, कोल्हापूर येथे आयोजित दुसऱ्या पर्वामध्ये एकू...
