अखेर तब्बल नऊ दिवसा नंतर तुरळक प्रमाणात काही भागात पिण्याचे पाणी नळाला -NNL
नवीन नांदेड। सिडको हडको परिसराला पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात येणारी मुख्य लाईन गेल्या आठ दिवसापूर्वी रस्ता खोदताना फुटल्याने सिडको हडको परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद झाला अखेर पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना ताटकळत रहावे लागले अखेर आठव्या दिवशी लोकप्रतिनिधी यांनी या बाबत केलेल्या तक्रारी दखल टॅकर व्दारे काही भागात तर नऊ दिवसानंतर काही भागात तुरळक प्रमाणात पाणी पुरवठा झाला आहे, पाणी पुरवठा विभागातील दोन अधिकारी यांच्यी बदली झाल्याने नव्याने आलेले अधिकारी हे पाणी पुरवठा विभागाकडे आली नसल्याने व माहिती नसल्याने नागरीकांना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी ताटकळत रहावे लागले आहे.
विष्णुपूरी जलाशयातून नांदेड वाघाळा महागरपालीका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सिडको हडको हडको परिसरात करण्यात येणारी पिण्याच्या पाईप लाईन रस्ता खोदत असल्याने फुटल्या गेल्याने तब्बल आठ दिवसापासून परिसरात...
