Wednesday, May 13

Tag: space is available for water supply at Nanded railway station

Nanded railway station  नांदेड रेल्वे स्थानकावर अखेर पाणपोईसाठी अखेर जागा उपलब्ध

Nanded railway station नांदेड रेल्वे स्थानकावर अखेर पाणपोईसाठी अखेर जागा उपलब्ध

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| रेल्वे स्थानकावर अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाणपोईसाठी अखेर जागा उपलब्ध झाली असून, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून चंद्रकांत गंजेवार यांच्या सौजन्याने समर्पित करण्यात आलेल्या आरओ थंड जलसेवेचे लोकार्पण खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या हस्ते जल्लोषात पार पडले. गेल्या चाळीस दिवसांपासून पाणपोईसाठी जागा मिळविण्याचा प्रयत्न चालू होता. या विषयावर प्रसार माध्यमांनी आवाज उठविल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ जागा उपलब्ध करून दिली. प्रवाशांना केवळ थंडच नव्हे, तर शुद्ध पाणी मिळावे, यासाठी आरओ सुद्धा बसविण्यात आला. ही सोय ॲड. दिलीप ठाकूर यांच्या तातडीच्या पुढाकारातून साकार झाली. गोपछडे यांच्या हस्ते जलसेवेचे उद्घाटन,प्रवाशांना दिले पाणी देवगिरी एक्सप्रेसने नांदेडात दाखल झाल्यानंतर खासदार गोपछडे यांचे ढोल-ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. प्लॅटफॉर्म नंबर ४ व...
error: Content is protected !!