Nanded Lok Sabha :; सामाजिक कार्यकर्ते महारुद्र पोपळाईतकर नांदेड लोकसभा व नांदेड दक्षिण विधानसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल – NNL
नवीन नांदेड l नांदेड लोकसभा मतदारसंघ व दक्षिण विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते महारूद्र हे केशवराव पोपळाईतकर यांनी काकांडी येथे आज दि. २८ आक्टोबर रोजी सत्याई देवी येथे नारळ फोडून आर्शीवाद घेऊन भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत नांदेड तहसिल कार्यालय येथे १ वाजता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व विधानसभा असे दोन नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे, यावेळी नांदेड तहसिल कार्यालय येथे शेकडो समर्थकांच्या उपस्थित होते.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकी साठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तरूण तडफदार व युवा नेते, म्हणून परिचित असलेले सामाजिक बांधिलकी जोपासणारे अपक्ष उमेदवार महारुद्र पोपळकाईतकर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सामाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवित सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक उपक्रम राबविले आहेत.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व दक्षि...
