Shri Mahadev Yatra : नांदेड जिल्ह्यातील मरळक येथील श्री महादेव यात्रेला शनिवारपासून प्रारंभ
नांदेड| जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले प्राचीन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर येथील श्री विमलेश्वराच्या यात्रेला दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंतीच्या दिवशी प्रारंभ होतो व ही यात्रा तीन दिवस चालते. यावर्षी दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी शनिवारी सकाळी गावकऱ्यांच्या सामूहिक महादेवाच्या अभिषेकाने यात्रेला प्रारंभ होतो मराठवाड्यातून तीन दिवसात श्री महादेवाच्या दर्शनासाठी हजारो भाविक भक्तगण येत असतात.
पौर्णिमेच्या दिवशी रात्री मरळक गावाच्या परिसरातील अनेक गावातून महादेवाच्या काठ्या कावळ्या दर्शनासाठी भक्तगण घेऊन येत असतात. शनिवारी रात्री दहा वाजता मरळक येथील सर्व महिलांच्या वतीने महादेवाला ओवाळण्यासाठी सामूहिक आरत्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रात्री बारा वाजता महादेवाची पालखी मिरवणूक यात्रेतून वाजत गाजत निघत असते.
पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल...
