CIDCO ; श्री हुजूर साहेब नांदेड सिडको ते शिर्डी पदयत्रेचे सिडको परिसरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत
नवीन नांदेड l श्री हुजूर साहेब नांदेड सिडको साईबाबा नगर बिडी कॉलनी साईबाबा मंदिर येथून निघालेल्या 27 जुलै रोजी शिर्डी कडे निघालेल्या या पदयात्रेचे सिडको हडको परिसरातील मुख्य मार्गावर रांगोळी, फटक्यांची आतिषबाजी ढोलताशांच्या गजरात व विविध ठिकाणी महाआरती, अन्नदानाचे वाटप करून स्वागत करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर विनय पाटील गिरडे यांच्या सह माजी लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांच्ये पदाधिकारी, सामाजिक संघटना व महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दर वर्षीप्रमाणे सलग 14 व्या वर्षी नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पालखी सोहळा 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता साईबाबा नगर बिडी कामगार कॉलनी सिडको येथून महाआरतीने प्रारंभ झाला,यावेळी वैजनाथ देशमुख,विनोद कांचनगिरे,डॉ.नरेश रायेवार,जयश्री जयस्वाल,सुषमा गहिरवार, यांच्या सह अध्यक्ष गणेश जैस्वाल, नागोराव वाघमोडे, गणेश भद्रे, मारोती वाघमारे,दता लोंढे,श...
