नांदेडला ‘एज्युकेशन हब’ बनवण्यात श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान -डी.पी.सावंत -NNL
नांदेड| ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या नांदेडला शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी शहरात पोषक वातावरण निर्माण करीत 'एज्युकेशन हब' बनवण्यात आपल्या श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव डी. पी. सावंत यांनी केले आहे.
शहरातील बाबानगर येथील श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले हायस्कूल येथील दहावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात डी. पी. सावंत बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर,यशवंत कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कबीर रबडे, प्रा कैलास दाड,मुख्याध्यापिका सौ.एस. आर. कदम,यशवंत महाविद्यालय जिनियस बॅचचे समन्वयक सचिन कदम,पर्यवेक्षक अरुण कल्याणकर ,एस.एन.सूर्यवंशी , सौ व्ही.आर. देशमुख आदींच...
