Shiv Chhatrapati State Sports Award ; शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
नांदेड | महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरीता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक/ शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने 29 डिसेंबर,2023 व 25 जानेवारी,2024 नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,2023 विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2023-24 या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्री...
