Suryakanta Patil ; राष्ट्रवादीचे पक्ष संघठन वाढवून शरद पवारांचे हात बळकट करणार -माजी मंत्री सुर्यकांता पाटील – NNL
नांदेड | आता हवा बदलली आहे, नागरिकांचा कौल महाविकास आघाडीला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी एकत्रित येवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष संघठन अधिक वाढवून खा.शरदचंद्र पवार यांचे विधानसभा निवडणुकीत हात बळकट करून नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकवू असे मत माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार नांदेड ग्रामीणची आढावा बैठक नुतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी दि.14 ऑगस्ट रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केली होती यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ.प्रदिप नाईक तर माजीमंत्री सुर्यकांता पाटील, माजीमंत्री माधवराव पाटील किन्हाळकर आणि नुतन जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ....
