Sunday, June 28

Tag: seriously injured.

Maralak ; मरळक येथे वानरांची दहशत मंदिरात दर्शनाला गेलेल्या व्यक्तीस वानरांच्या टोळीचा हल्ला, गंभीर जखमी

Maralak ; मरळक येथे वानरांची दहशत मंदिरात दर्शनाला गेलेल्या व्यक्तीस वानरांच्या टोळीचा हल्ला, गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड l मरळक येथील प्रसिद्ध विमलेश्वर महादेव मंदिरात आज सकाळी दर्शनासाठी गेलेल्या महारुद्र स्वामी या भाविकावर सुमारे २५ ते ३० वानरांनी अचानक हल्ला चढविला, या हल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महारुद्र स्वामी हे रोजप्रमाणे मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिर परिसरातील झाडांवर मोठ्या संख्येने वानरांचे वास्तव्य असून, भाविकांना वारंवार त्रास दिल्याच्या तक्रारी पूर्वीपासूनच येत होत्या. त्याचवेळी मंदिराच्या गेटजवळ बसलेल्या वानरांच्या टोळीने एका महिलेस त्रास देत असल्याचे दिसताच महारुद्र स्वामी यांनी मदतीसाठी पुढे पाऊल टाकले. परंतु अचानक वानरांची टोळी स्वामींवर झेपावली आणि त्यांना जमिनीवर पाडून गंभीर जखमी केले. गावातील नागरिकांनी आवाज ऐकून घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी काठ्या घेऊन वानरांना हुसकावून लावले ...
error: Content is protected !!