Senior media expert Dr. Dhole : सामाजिक –राजकीय अस्थैर्याच्या काळातच पत्रकारितेचे महत्व अधिक – ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉ. विश्राम ढोले यांचे प्रतिपादन -NNL
नांदेड| स्वातंत्र्य पूर्व काळात सामाजिक, राजकीय विषय पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होते. स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेवर विकासाचे गारुड निर्माण झाले. नव्वदच्या दशकात पत्रकारितेचे व्यापारीकरण होण्यास सुरुवात झाली. अलीकडच्या काळात नव माध्यमांचा झपाट्याने झालेला विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे जीवनाच्या विविध अंगात आमुलाग्र बदल झाले. यातून समाजात अस्थैर्य आले. पण जेव्हा जेव्हा सामाजिक –राजकीय अस्थैर्य येते त्या काळातच पत्रकारितेचे महत्व अधिक असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यम तज्ञ डॉ. विश्राम ढोले यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त ‘डिजिटल युगात पत्रकारितेचे बदलते संदर्भ’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे परीक्षा व मूल...
