Second day of indefinite strike of employees : प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कर्मचारी यांच्या बेमुदत संपाचा दुसरा दिवस,मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा -NNL
नवीन नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना संलग्न मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना नांदेड यांच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सहभागी होऊन कर्मचारी यांनी २४ सप्टेंबर पासून रास्त व न्यायिक मागण्यासाठी आकृतीबंधाची अमंल बजावणी करावी यासह विविध मागण्या साठी कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी प्रवेशद्वार येथे बेमुदत संपाचा दुसरा दिवस असून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचा बेमुदत संपास पाठिंबा जाहीर केला. सलग दुसऱ्या दिवशी कर्मचारी यांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
राज्यभर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर्मचारी संघटना यांच्या वतीने २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला असून नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथेही संघटनेच्या वतीने सेवा प्रवेशाची तात्काळ अमंल बजावणी करावी, समायोजन रद्द करावे, महसुली बदल्या रद्द करा, कळसकर समितीची सुधार...
