Road Blockade against water supply ; रास्ता रोको आंदोलनाची पाणीपुरवठा विभागाला धास्ती.,, एका महिन्यात पाणीपुरवठा योजना चालू करण्याचे लेखी आश्वासन
नायगांव/नांदेड। मांजरम गावच्या पाणीपुरवठा योजना बोगस व निकृष्ट दर्जाची झाल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते, त्या अनुषंगाने आज १० फेब्रुवारी रोजी मुखेड- नांदेड रस्त्यावर मांजरम येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचे जाहीर केले होते या आंदोलनाची दखल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ घेऊन घेतली.
कार्यकारी अभियंता एम.एस बोडके यांनी एका महिन्यामध्ये ही योजना चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांना लेखी दिलेल्या पत्रात सांगितलेले आहे. पांडूरंग शिंदे यांनी ज्या मागण्या केल्या त्यानुसार संतोष कन्स्ट्रक्शन व रोहित कन्स्ट्रक्शन या दोन्ही कंत्राटदारावर दंड आकारण्यात आला आहे आणि पाणीपुरवठा सुरळीत चालु होणार नाही तोपर्यंत देयके रोखून धरण्यात आली आहेत असे लेखी सांगण्यात आले आहे.
या लेखी आश्वासनामु...
