Nanded Crime : नांदेडमध्ये गुन्हेगारीचा वाढता कहर; कायद्याच्या राज्यासाठी ठोस उपायांची गरज
नांदेड,गोविंद मुंडकर| शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा हत्या, गोळीबार, तसेच टोळ्यांमधील रक्तरंजित संघर्ष या घटनांमुळे नांदेडची ओळख “गुन्हेगारांचे शहर” अशी बनत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.
अलीकडेच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी-मार्ट परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास दोन टोळ्यांमध्ये जुना वाद उफाळून आला. या वादातून तलवारी व खंजीरांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या भीषण संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला असून एका जखमी व्यक्तीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचाही खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाणे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही टोळ्यांतील अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार...
