Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL
नांदेड l होळकरनगर सिडको नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,या बैठकिला मार्गदर्शन करताना अध्यक्षिय भाषणात प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी शेवते म्हणाले आपला पक्ष २८८ जागेवर स्वबळावर लढवण्याचे ठरविले आहे.
त्या दृष्टिने आपापल्या मतदारसंघात तालुका प्रमुखांनी कार्यकर्त्यां सोबत घेवून बुथ बांधणीच्या कामाला लागावे आणि गाव तिथे शाखा काढावेत. आपल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी पक्षाकडे आपल्या मार्फत अर्ज करावेत, त्यातून पक्षाने जो उमेदवार देतील त्यांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर म्हणाले, जो पर्यंत स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकिच्या रिंगणात पक्ष उतरणार नाही तो पर्यंत पक्ष मोठा होणार नाही आणि पक्ष सत्तेत येणार नाही.
सत्तेत आल्याशिवाय राष्ट्रीय समाजास...
