soybean cotton farmers : सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या -NNL
नांदेड| महाराष्ट्र शासनाने सन २०२३ खरीप हंगामासाठी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हेक्टरपर्यंत हेक्टरी ५ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा शासन निर्णय दि. २९जुलै २०२४ रोजी घेण्यात आला. त्या निर्णयामध्ये ई पीक पाहणी द्वारे पिकाची लागवडीची नोंद केलेल्याच शेतकऱ्यांनाच ही मदत मिळणार आहे. अशी अट घातल्यामुळे नांदेड जिल्ह्यातसह राज्यातील अनेक शेतकरी यापासून वंचित राहणार आहे.
ई पीक पाहणी नोंद ही रद्द करून सरसकट सर्व सोयाबीन- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत देण्यात यावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली.
निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या चार वर्षापासून सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन -कापूस उत्पादक शेत...
